कामशेतहून पवना धरणाकडे जाताना मावळ तालुक्यातील बेड...

update image

कामशेतहून पवना धरणाकडे जाताना मावळ तालुक्यातील बेडसे गावातील “बेडसे लेणी”... लेणीची रचना सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते.. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते... येथील चैत्यगृह भव्य आहे याची उंची सुमारे २८ फूट आहे समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे.. चैत्यगृहा समोर मध्यभागी चार खांब आहेत यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त आहेत यांची रचना अशी अहे की त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे असे दिसते हे खांब लेण्यांच्या पायापासून थेट छतापर्यंत जातात चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे त्यावर एक चौरंग कोरलेला आहे छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात.. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केलेत त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे.. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीवकाम आहे यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात त्यावरून तिथे खरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे... बेडसे येथील स्तंभ मौर्य शैलीतील आहेत असे मानतात.. तसेच त्यांना त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हंटले जाते पर्सिपोलिस हे इराण मधील एक प्राचीन शहर होते.. मौर्य साम्राज्याचा संबंध येथ पर्यंत होता असे हे स्तंभ दर्शवतात.. एका खोलीच्या द्वारपट्टीवर एक लेख आहे, ‘नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं’ या कोरीव अक्षरांचा अर्थ : नाशिकयेथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्याचे दान दिले या लेखात आजच्या नाशिक शहराचा प्राचीन उल्लेख मिळतो.. या लेण्यांच्या बाहेर पाण्याची कुंडे आहेत यातील एका कुंडावर त्यासाठी दिलेल्या दानाचा लेख दिसून येतो... ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👌🏼🚩🔥🙏🏻

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment