महाराष्ट्रातील अतिप्राचीन लेण्यांपैकी एक आहे. विसा...

update image

महाराष्ट्रातील अतिप्राचीन लेण्यांपैकी एक आहे. विसापूरच्या एका बाजूला लोहगड आणि दुस-या बाजूला बेडसे लेण्यांचा डोंगर आहे. इथे येण्यासाठी कामशेतवरून काळे कॉलनीवरून रस्ता आहे. कामशेतपासून आठ-नऊ किमी अंतरावर बेडसे नावाचे गाव आहे. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. हीनयान पंथाची ही लेणी आहे. गावापासून साधारण अध्र्या तासावर ही लेणी आहेत. चैत्यगृह, प्रार्थना हॉल, भव्या स्तूप ही येथील वैशिष्टय़ आहेत. पाय-या चढून गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दिसतं. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर कोरलेला आहे. इथले २५ फूट स्तंभ स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. ही लेणी मौर्य शैलीतील आहेत असं मानतात. सुमारे दीडशे मीटर लांबीच्या दगडात या लेण्या कोरल्या आहेत. एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप आणि पाण्याची कुंडं आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील आहे. असं म्हटलं जातं. या लेण्या प्राचीन काळी मारकूड या नावानेही ओळखल्या जायच्या. या लेण्यांमधलं चैत्यगृह भव्य आहे. याची उंची सुमारे २८ फूट आहे. समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. याच्यामागे खोलवर कोरलेलं चैत्यगृह आहे. चैत्यगृहासमोर मध्यभागी चार खांब आहेत. हे खांब लेण्यांच्या पायापासून छतापर्यंत जातात. खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर मोठे-मोठे घट कोरलेले आहेत. यातून हे अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. त्या चौथ-यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोडया दिसतात. त्यांची वेशभूषा स्पष्ट दिसते. आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्टय़च आहे. मुख्य चैत्यगृहाच्या दाराशी असलेल्या भिंतीच्या वर पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. या कमानीखाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या दिसतात. मधल्या आणि डव्या कमानीखालून चैत्यगृहात जाण्याचे मार्ग आहेत. उजवीकडची कमान जाळीदार छिद्रांच्या नक्षीतून सुंदर गवाक्ष कोरलेली दिसतात. प्रत्येक चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची नक्षी गुंफलेली दिसते. तर चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती आहे. चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतीकंही कोरलेली आह

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment